तालुक्यातील कुचना गावाजवळून हाय वे चे चौपदरीकरण करण्यात आले आहे.या ठिकाणी नेहमी नागरीकांची वर्दळ असल्यामुळे व येथे बस थांबा नसल्याने नागरीकांना अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.हे टाळण्यासाठी येथे रस्त्याच्या दुतर्फा स्ट्रिटलाईट लाऊन बस थांब्याची सुविधा द्यावी अशी मागणी कुचना ग्रामपंचायतीचे उपसरपंच मनोज तिखट यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयात सादर करण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.