ठाणे: ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 'अशी' केली माणुसकीची दिवाळी....
Thane, Thane | Oct 22, 2025 यावर्षी अतिवृष्टीमुळेमहाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना मदतीसाठी महाराष्ट्र शासनासह विविध संस्था आणि व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय देखील या मदत कार्यात क्यू आर कोड च्या माध्यमातून पुढे सरसावले. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक घेतली आणि 'एक हात पूरग्रस्तांच्या मदतीकरिता' या अंतर्गत माणुसकीची दिवाळी उपक्रम राबवला. अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात स्वेच्छा निधी जमा केला.