जालना: अंतरवाली सराटी येथे जिल्हाधिकार्यांचा मुक्काम दौरा; जलसंवर्धन, ग्रामविकास व विशेष सखोल पुनरीक्षणावर भर
Jalna, Jalna | Jul 7, 2026 जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी 06 जुलै रोजी मौजे महाकाळा येथे मुक्काम करून मंगळवारी (दि.7) सकाळी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावाला भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. मंगळवार दि. 7 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार यावेळी जलसंवर्धन, ग्रामविकास, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच विशेष सखोल पुनरीक्षण अभियानाचा आढावा घेत संबंधित अधिकार्यांना आवश्यक सूचना दिल्या. गावभेटी दरम्यान जिल्हाधिकारी मित्तल यांनी नागरिकांशी संवाद साधून चर्चा केली.