खालापूर: खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रसायनी येथे समर्थ नेत्रालय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व यंत्रसामग्रीने सुसज्ज इमारतीच्या नूतनीकरण कामाचे उद्घाटन
आज रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास खालापूर तालुक्यातील रसायनी येथे समर्थ नेत्रालय (डोळ्यांचे रुग्णालय) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज इमारतीच्या नूतनीकरण व विस्तारीकरणाचा भव्य उद्घाटन सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी उपस्थितांना संबोधित केले व रुग्णालयाच्या मान्यवरांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास सुधाकर घारे, उमा मुंढे, संदीप मुंढे तसेच पक्षाचे पदाधिकारी, डॉक्टर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.