नागपूर शहर: शासकीय रुग्णालयात 17 वर्षीय मुलीने दिला बाळाला जन्म, अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अंबाझरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मीना बारंगे यांनी 7 मेला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या संजय दास मानिकपुरी या आरोपीला अंबाझरी पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बाळाला जन्म दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मीना बारंगे यांनी दिली आहे.