चंद्रपूर: शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थान येथे खा.प्रतिभाताई धानोरकर व आ.विजय वडेट्टीवार यांनी घेतले विठुरायाचे दर्शन
शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थान येथे आज दि 6 जुलै ला 12 वाजता आषाढी एकादशीच्या निमित्ताने काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे गटनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभाताई धानोरकर, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रितेश तिवारी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यांनी विठुरायाचे मनोभावे पूजा अर्चना करून दर्शन घेतले.