लातूर: कर्जमाफी न झाल्यास आमदार-खासदारांच्या तोंडाला काळे फासू! — छावाचा इशारा
Latur, Latur | Sep 15, 2025 लातूर- शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करून ७/१२ उतारा कोरा करण्याचे आश्वासन शासनाने दिले असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय छावा संघटनेचे नेते नानासाहेब जावळे पाटील यांनी सरकारला तीव्र इशारा दिला आहे.