हिंगणघाट: गोलबाजार परीसरात ईलेक्ट्रीक जुगारावर पोलिसांची धाड: २ लाख ६४ हजार १९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट शहरातील गोलबाजार परीसरात ईलेक्ट्रीक जुगारावर पोलिसांची धाड टाकून २ लाख ६४ हजार १९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार प्रभारी ठाणेदार अनिल राउत यांना मिळालेल्या गोपनिय माहिती वरून गुन्हे प्रगटीकरण पथकाचे प्रमुख प्रविण बावणे, यांनी पोलीस गोलबाजार येथील लक्ष्मी व्हिडोओ गेम पार्लर मध्ये चालत असलेल्या पैसेच्या हारजितचे जुगार वर छापा टाकला असता.याठिकाणी जुगार साहित्य आढळून आले.