हिंगणघाट: जाम येथे एका शेतकरी पुत्राची आत्महत्या तर वायगाव हळदया येथिल युवकाचा शेतात आढळला मृतदेह
जाम व वायगाव हळदया याठिकाणी एकाच दिवशी वेगवेगळ्या तरुण होतकरु युवकांच्या मृत्यूच्या घटना सोमवारी उघडकीस आल्या असून जाम येथे विवाहित युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली तर वायगाव हळद्या येथे शेतात युवकांचा मृतदेह आढळून आला.सदर घटना वायगाव ( हळदया ) येथिल रुपेश रवि खडतकर वय २० वर्ष हा तरुण शनिवार पासून घरून बेपत्ता असल्यामुळे घरच्यानी त्याचा शोध घेतला असता तो आढळला नाही मात्र आज रोज सोमवाराला दुपारी २ वाजताचे दरम्यान मारोती घुमटकर यांच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला.