कल्याण: मलंग गड येथे ओव्हरटेक करण्याच्या नादात कार दुभाजकावर धडकून अपघात
Kalyan, Thane | Oct 19, 2025 कल्याणच्या मलंगगड परिसरामध्ये अपघात झाल्याची घटना घडली आहे. मलंगड रोड येथे दुसऱ्या करण्याच्या नादामध्ये कारचालकाला रस्त्यावरील डिव्हायडर दिसले नाही आणि कार दुभाजकावर धडकून अपघात झाला. माहिती मिळतच वाहतूक व पोलीस क्रेन घटनास्थळी दाखल झाले आणि क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु कारचे नुकसान झाले आहे.