नाशिक: देवळाली कॅम्प, सह्याद्री नगर येथे बिबट्याचा वावर कायम; वनविभागाने केली पाहणी
Nashik, Nashik | Sep 17, 2025 देवळाली कॅम्प भागात सह्याद्री नगरमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.देवळाली कॅम्प येथील सह्याद्री नगर परिसरातील कांडेकर वस्ती येथे बिबट्या एका घराच्या उंब-यात आला होता.घराभोवती गिरक्या घालून कुंपणात आडोशाला निघून गेला.वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी पाहणी केली असून नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.