नागपूर शहर: स्वस्त धान्य मिळवून देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; दोन आरोपींना अटक : संदीप बुवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक
यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी 2 एप्रिलला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार आदिवासी विभागातून स्वस्त दरात तांदूळ आणि तूर डाळ मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका भंगार व्यावसायिकाची तब्बल ८ लाख ८८ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी एकूण ८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी दोघांना अटक केली आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली आहे