नागपूर शहर: यशोधरानगर पोलिसांची कारवाई: मांजरी परिसरात गांजा विक्री करणारा अटकेत: सदाशिव कणसे पोलीस उपनिरीक्षक
यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे यांनी 18 जूनला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार,यशोधरानगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत मांजरी परिसरात गांजा विक्री करणाऱ्या शेख आदिल शेख करीम याला अटक केली. आरोपीकडून २२४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असून, यशोधरानगर पोलीस अधिक तपास करत आहेत. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव कणसे यांनी दिली आहे.