हदगाव: खुदबेनगर येथे पत्नीकडून पतीचा खून; भावांच्या मदतीने घडविला प्रकार; दोघांना हदगाव पोलीसांनी केली अटक, खुनाचा गुन्हा दाखल
Hadgaon, Nanded | Oct 23, 2025 हदगाव शहरातील खुदबे नगर येथे दि २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सव्वासहाच्या दरम्यान यातील मयत नामे मुखीद मोईन मिर्झा वय 32 वर्ष यास यातील आरोपी नामे १) समिना मुखीद मिर्झा २) सोहेल कलीम शेख ३)आसिफ कलीम शेख यांनी संगमत करून मैताने भावाचे पत्नीसोबत भांडण केल्याचे कारणावरून मारहाण करून खून केला याप्रकरणी मोजाहीद मिर्झा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हादगाव पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील २ आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आली असून आज दुपारी अधिक तपास सुरू आहे.