नागपूर शहर: अन्न व औषध प्रशासन विभागाचा धडाका गृहमंत्र्याच्या शहरात अवैध सुगंधित तंबाखूवर मोठी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धाडीमध्ये नागपुरात मोठ्या प्रमाणावर अवैध सुगंधित तंबाखू आणि पानमसाला जप्त करण्यात आला आहे. पाचपावली पोलीस आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मिळून ही कारवाई केली.आझाद बुनकर कॉलनी, पाचपावली येथील रहिवासी अझर इकबाल कुरेशी याच्या घरी धाड टाकून ही कारवाई करण्यात आली.