फलटण: मुख्यमंत्री रविवारी फलटण दौऱ्यावर; माजी खासदार आणि विद्यमान आमदारांकडून दौऱ्याची जय्यत तयारी सुरू
Phaltan, Satara | Oct 21, 2025 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या फलटण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील हे फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा झंझावाती दौरा करणार आहेत. बुधवार दि. २२ ते शनिवार दि. २५ ऑक्टोबर या चार दिवसांच्या कालावधीत ते जिल्हा परिषद गटनिहाय आणि फलटण शहरातील प्रभागनिहाय बैठका घेऊन नियोजनाचा आढावा घेणार आहेत.