नागपूर शहर: इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अनोखे 'झोपा काढा' आंदोलन
राज्यात निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये झालेली वाढ तसेच बाजारपेठेत निर्माण झालेल्या टंचाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने नागपुरात तीव्र निदर्शने करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रतीकात्मक 'झोपा काढा' आंदोलन केले.