नागपूर शहर: नागपुरात 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत मोठी कारवाई; लाखोंचा प्रतिबंधित गुटखा जप्त : विनायक गोल्हे, पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी 16 एप्रिल ला रात्री 8 वाजता दिलेल्या माहितीनुसार नागपूर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहरात राबवल्या जात असलेल्या 'ऑपरेशन थंडर' मोहिमेला मोठे यश आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने जरीपटका परिसरात एका ट्रकवर छापा टाकून सुमारे १९ लाख ३९ हजार ७६० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखू जप्त केला आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिली आहे.