तालुक्यातील पाली येथे चोरट्याने कॅनरा बँक फोडली, भिंत फोडून 18 लाख रुपये केले लंपास
Beed, Beed | Oct 30, 2025 धुळे-सोलापूर महामार्गालगत बीड शहरापासून अवघ्या सात किलोमीटरवर असलेल्या पाली ता.जि. बीड येथील मुख्य रस्त्यावर असलेली कॅनरा बँकेत गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी धाडस चोरी केली. या घटनेत अंदाजे अठरा लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास बँकेच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने लॉकर फोडून रोकड चोरून नेली.