नागपूर शहर: गॅस दरवाढ आणि तुटवड्याविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; संविधान चौकात 'चुलीवर स्वयंपाक' करून सरकारचा निषेध
गॅस सिलिंडरच्या दरात झालेली भरमसाठ वाढ, पुरवठ्यातील अनियमितता आणि बाजारपेठेत सुरू असलेला सिलिंडरचा काळाबाजार या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीने नागपूरच्या ऐतिहासिक संविधान चौकात आगळेवेगळे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी चक्क रस्त्यावर चुली पेटवून त्यावर स्वयंपाक करत सरकारचा तीव्र निषेध नोंदवला.