कराड: कराड आणि मलकापूर शहरातील विविध विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर;
आ.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश
Karad, Satara | Oct 21, 2025 दिवाळीच्या शुभमुहूर्तावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून कराड व मलकापूर शहरवासीयांसाठी अनोखी विकासकामांची भेट दिली आहे. त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे कराड व मलकापूरमधील विविध विकासकामांसाठी तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. कराड व मलकापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांनी या संदर्भात मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता माहिती दिली आहे.