पनवेल: वाशीमध्ये मित्रांची वाट बघत असलेल्या व्यक्तीचा लांबविला मोबाईल, अज्ञातावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Panvel, Raigad | Apr 13, 2024 वाशी सेक्टर-२८ येथील वॉकिंग पाथवर खेळण्यासाठी मित्रांची वाट बघत असलेल्या एका व्यक्तीचा अज्ञाताने मोबाईल लंपास केला. १३ एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली. समीर पांचाळ असे व्यक्तीचे नाव असून त्यांनी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत चोरटा मोटरसायकलवरून पळून गेला होता. या संदर्भात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.