नागपूर शहर: गुलमोहर नगरमध्ये छापेमारी; घातक शस्त्रांसह दोन जणांना अटक : प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 15 जूनला दुपारी 4:30 वाजता दिलेल्या माहितीनुसार कलमना पोलिसांनी एका कारवाईत गुलमोहर नगर परिसरातून कुणाल मोहन बंजारे आणि तरुण वर्मा या दोन तरुणांना घातक शस्त्रांसह अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे आरोपी राजस्थानमधील खाटू श्याम येथून ही शस्त्रे घेऊन आले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून एक तलवार आणि दोन मोठे चाकू जप्त केले असून, या शस्त्रांची एकूण किंमत ६,६०० रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्