नागपूर शहर: नंदनवन हद्दीत जुन्या वादातून तरुणाची हत्या; मुख्य आरोपीसह अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात
23 मे ला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या वादातून एका ३२ वर्षीय तरुणाची चाकू आणि दगडाने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संजय उर्फ मोनू दुर्गाशंकर ठाकूर असे मृत तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, २२ मे ला रात्री नंदनवन झोपडपट्टी परिसरातील जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी आयुष जयपाल लुडेलकर आणि त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराने संगनमत करून संजयवर चाकूने छातीवर व पोटावर सपासप वार केले. तसेच त्या