नागपूर शहर: नागपुरात क्लिनिकला भीषण आग, सुदैवाने मोठी जीवित हानी टळली
नागपूरमधील रामदासपेठ येथील युगधर्मा कॉम्प्लेक्सच्या 'ए' विंगमध्ये शनिवारी सायंकाळी आगीची घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या डॉ. सुरेंद्र पाटील यांच्या क्लिनिकमध्ये एअर कंडिशनिंग शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सुदैवाने, घटनेच्या वेळी क्लिनिकमध्ये कोणीही नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.