जालना: जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आवाहन: पाणीपट्टी व मालमत्ता कर वेळेत भरा, अन्यथा एप्रिलपासून कारवाई
Jalna, Jalna | Mar 31, 2026 जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जालना महापालिकेच्या आयुक्त आशिमा मित्तल यांनी नागरिकांना पाणीपट्टी आणि मालमत्ता कर वेळेत भरण्याचे आवाहन केले आहे. या करांमधून मिळणार्या निधीतून शहर व जिल्ह्याच्या विकासकामांना गती मिळणार असल्याने सर्व नागरिक आणि व्यावसायिकांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असे त्यांनी स्पष्ट केले. मंगळवार दि. 31 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता त्यांनी प्रसिध्दी माध्यमांना या बाबत माहिती दिली. श्रीमती मित्तल म्हणाल्या की,अनेक नागरिक आणि व्यावसायिकांनी अद्याप कर भरला नाही.