अंबड: अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांच्या याद्या सादर करा; अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांचे ग्रामविकास अधिकारी यांना आदेश
Ambad, Jalna | Jul 8, 2025 तालुक्यात वर्ष २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बांधीत शेतकऱ्यांना संदर्भीय शासन निर्णयानुसार अनुदान मंजूर करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही त्यांच्या याद्या तहसील कार्यालयात सादर करण्याचे निर्देश तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिले आहेत. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले, की आजपर्यंत ग्राम महसूल अधिकारी यांनी सजातील खातेदार यांच्या याद्या अपलोड करण्यासाठी तहसील कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या आहे. परंतु अनेक सजेतील लाभार्थी अनुदानापासून वंचित अथवा अनुदान याद्या अपल