ठाणे: वागळे परिसराच्या हाजुरी येथे ड्रग तस्कराकडून दांपत्याला क्रूरपणे मारहाण, घटनेचा थरारक व्हिडिओ आला समोर
Thane, Thane | Oct 8, 2025 ठाणे शहराच्या वागळे इस्टेट परिसरातील हाजुरी सर्कल येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ड्रग्स तस्कराकडून एका दाम्पत्यावर हल्ला करण्यात आला आहे 24 वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या 22 वर्षीय पत्नीवर हा क्रूर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये दोघेही पती पत्नी गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घडलेला हा सर्व प्रकार एका व्यक्तीने मोबाईल मध्ये चित्रित केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.