अलिबाग: ग्रामपंचायतीमुळेच शासनाच्या योजना खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात पोहोचतात
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
Alibag, Raigad | Oct 18, 2025 केंद्र व राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम ग्रामपंचायतीमार्फत होते. ग्रामपंचायत नसेल तर कुठलीही योजना प्रभावीपणे अंमलात येऊ शकत नाही, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. राय गड जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार आणि गुणगौरव समारंभ क्षत्रीय समाज सभागृह, कुरूळ येथे उत्साहात पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. वेळी व्यासपीठावर आम महेंद्र दळवी, जिख्यp कार्यकारी अधिकारी नेहा भोसले उपस्थित होते.