नागपूर शहर: नागपूर पुन्हा हादरले: 'अन्ना गँग'चा धुमाकूळ; एकाच दिवसात तीन मोठ्या चोरीच्या घटना
शहरात पुन्हा एकदा कुख्यात 'अन्ना गँग'चा उच्छाद पाहायला मिळत आहे. एकाच दिवसात नागपूरच्या तीन वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या चोरीच्या मोठ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व घटनांमध्ये एकाच टोळीची कार्यपद्धती दिसून येत आहे.