तेल्हारा: हिवरखेडमध्ये पहिलीच ऐतिहासिक निवडणूक; 21 लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदार उत्सुक
Telhara, Akola | Dec 1, 2025 अकोल्यातील हिवरखेड नगरपरिषदेची पहिली ऐतिहासिक निवडणूक आज होत असून पंचवीस वर्षांच्या संघर्षानंतर स्थापन झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे. नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवक असे एकूण 21 शिलेदार निवडण्यासाठी मतदार सज्ज झाले आहेत. मागील अनेक वर्षांतील विकासकामांचा अभाव, बंद पडलेली शासकीय कार्यालये, रखडलेले प्रकल्प, तालुका मान्यता आणि ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न हे प्रलंबित आहेत.