नागपूर शहर: कळमना परिसरात अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला; आरोपीची काढण्यात आली धिंड
2 जुलैला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डिप्टी सिग्नल परिसरात एका कार्यक्रमातून परतणाऱ्या १४ वर्षीय मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गंभीर घटनेत मदन वर्मा नामक नागरिकाच्या प्रसंगावधानामुळे आणि सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलाचा जीव थोडक्यात वाचला.घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासचक्र फिरवले आणि काही वेळातच आरोपीला जेरबंद केले. पोलीस चौकशीत आरोपीची ओळख १९ वर्षीय निलेश भोयर अशी