मालेगाव: मालेगाव तालुक्यातील वडेल येथील देवी विसर्जनासाठी गेलेला तरुण बेपत्ता...
मालेगाव तालुक्यातील वडेल येथील देवी विसर्जनासाठी गेलेला तरुण बेपत्ता... जयेंद्र समाधान भदाणे (वय 23) हा तरुण मोसम नदीत बुडाल्याची दुदैवी घटना घडली आहे. संभाजीनगर सिडको येथे 10 ते 15 तरुण देवी विसर्जनासाठी गेले होते. यापैकी दोन तरुण नदीत उतरले असता, गौरव महाले वाचला मात्र जयेंद्र बेपत्ता झाला. काल दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास हा प्रसंग घडला. नदी पात्रात जयेंद्र भदाणे याचा शोध सुरू अद्यापही सुरू आहे.