पनवेल: तिसरी मुंबईसाठी ऑनलाईन भूसंपादन प्रक्रिया; २७ एप्रिलपासून प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरूवात
Panvel, Raigad | Apr 22, 2026 अटल सेतू प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादनाची प्रक्रिया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केली आहे. त्यानुसार भूसंपादनासाठी जमीन मालकांची संमती घेण्याची प्रक्रिया २७ एप्रिलपासून सुरू केली जाणार असून त्यासाठी ऑनलाइन अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. प्रकल्पग्रस्तांना सिडको आणि एमआयडीसीच्या धोरणाप्रमाणे 22.5 टक्के विकसित भूखंडाचा परतावा, रोख भरपाई किंवा एफएसआय/टीडीआर स्वरूपात मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.