नागपूर शहर: नागपुरात भीषण अपघात: झेप्टो डिलिव्हरी बॉयचा मृत्यू; आरोपी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल
24 मेला दुपारी 05:30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे २१ वर्षीय झेप्टो डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला आहे. आदित्य रमेशवर मेश्राम असे मृत तरूणाचे नाव आहे.२३ मे रोजी रात्री सावरकर नगर ते प्रतापनगर चौक दरम्यान हा अपघात घडला. आदित्य हा आपल्या मोपेडने डिलिव्हरीसाठी जात असताना, पाठीमागून येणाऱ्या भरधाव अपाचे मोटरसायकलने त्याला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या आदित्यचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अपाचे चालक युवराज मु