लूज तेलावर बंदी; पण गरीबांचं काय? ₹१५चं तेल घ्यायला आलेल्या वृद्ध महिलेची व्यथा समोर
लूज तेलाच्या विक्रीवर निर्बंध आल्यानंतर त्याचा सर्वसामान्य आणि गरीब ग्राहकांवर काय परिणाम होतोय, हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. मोठं पॅकेट खरेदी करणं परवडत नसलेल्या ग्राहकांसाठी ₹१०-३१५चं तेलही महत्त्वाचं असतं. अशाच एका वृद्ध महिलेचा अनुभव समोर आला आहे.
भेसळ आणि अन्नसुरक्षेच्या दृष्टीने नियम आवश्यक आहेत; मात्र हे नियम करताना गरीब आणि रोजंदारीवर जगणाऱ्या कुटुंबांच्या अडचणींचाही विचार व्हायला हवा, असा मुद्दा या घटनेतून समोर येतो.