पाचोरा: चुंचाळे शेत परिसरात बिबट्याचे दर्शन, बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी भयभीत शेती कामे खोळंबली,
पाचोरा तालुक्यातील चुंचाळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे, या परिसरातील शेत शिवारात बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना दिनांक 10 जानेवारी च्या मध्यरात्री झाले, यावेळी शेतात काम करणारे शेतमजूर हे भयभीत झाले त्यांनी शेताकडून गावाकडे पळ काढला, बिबट्याचा वावर शेत परिसरात असल्याची चर्चा पसरल्याने गावातील शेतकरी शेताकडे शेतमजुरी करण्यासाठी जाने कामे धजावत असून शेती कामे खोळंबली आहेत, तरी संबंधित वन विभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.