मोर्शी: मोर्शी ते शिंभोरा मार्गावरील खुल्या कारागृहाजवळ,झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघांना गंभीर दुखापत
दिनांक 27 सप्टेंबरला दुपारी एक वाजताची दरम्यान मोर्शी शिंभोरा मार्गावरील खुल्या कारागृहाजवळ दोन दुचाकी आपसात धडकून झालेल्या अपघातात, हेमंत जगन्नाथराव निंभोरकर राहणार लिंगा तालुका आष्टी यांचा जागेवरच मृत्यू झाला असून उमेश शंकरराव गोडबोले यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याच अपघातात एक मुलगा व मुलगी देखील जखमी असून यश शिवराम पवार नावाच्या मुलाने दुचाकी भरधाव व निष्काळजीपणे चालवून हा अपघात झाल्या असल्याचे कळते. पुढील तपास मोर्शी पोलिसांकडून सुरू आहे