खामगाव: अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकास टेंभुर्णा शिवार येथे पकडले
अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकास इसमास खामगाव ग्रामीण पोलिसांनी टेंभुर्णा शिवार येथे २ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजेदरम्यान पकडले. नापोका बाळकृष्ण फुंडकर यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे टेंभुर्णा शिवार, येथे छापा टाकून शेख नबिउल्ला शेख बिस्मिल्ला, वय 47 वर्षे, रा. इकबाल नगर, बुलढाणा यास पकडले.व त्याच्या ताब्यातून पोलिसांनी देशी दारू ३० नग शिष्या व वायरची थैली असा एकूण १५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.