आमदार सुरेश धस यांनी जातीपातीचे राजकारण केलं असून त्यांचा राजीनामा घेऊन एसआयटी चौकशी करा, भाजपा युवा नेते मनोज चौधरी
आमदार सुरेश धस यांनी जातीपातीचे राजकारण सुरू करून संपूर्ण बीड जिल्ह्याची बदनामी केली असून याप्रकरणी एसआयटी व सीआयडीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी भाजपाचे युवा नेते मनोज चौधरी यांनी केली आहे. ते बीड येथील शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी बोलत होते. मनोज चौधरी यांनी आरोप करताना सांगितले की, आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवून “गुंडाराज” निर्माण केला असून त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि कृतीमुळे जिल्ह्यात सामाजिक तेढ निर्माण होत आहे.