वसई: आचोळे पोलीस स्टेशन मधल्या पोलीस कर्मचाऱ्यांना इंग्लिश स्पिकिंगचे धडे तर महिला पोलिसांना दिल जात आहे कराटेचे प्रशिक्षण.
Vasai, Palghar | Jan 18, 2025 आचोळे पोलीस स्टेशनमध्ये एक दिशादर्शक कार्य केलं जात आहे. आचोळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या पोलीस स्टेशन मधल्या पोलीस कर्मचाऱ्यांना इंग्लिश स्पिकिंग चे धडे दिले जात आहेत यासोबतच महिला पोलिसांना अधिक सक्षम करण्यासाठी त्यांना कराटेचे प्रशिक्षण दिले जात आहे.