जालना: जामवाडी येथे अवकाळी पावसाचा रब्बी पिकांसह आंबा बागांना फटका
Jalna, Jalna | Mar 31, 2026 आज दिनांक 31 मार्च रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घातली आहे. काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांसह आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जालना तालुक्यातील जामवाडी शिवारात अनेक आंबा बागांमध्ये फळगळ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. येथील शेतकरी विजय पंडितराव वाडेकर यांच्या विक्रीसाठी तयार झालेल्या आंबा बागेला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे