जालना: मौजपुरीत गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम; भव्य रक्तदान शिबिरातून दाखवीली मानवता; श्री शिवयोगी गणेश मित्र मंडळाला प्रतिसाद
Jalna, Jalna | Sep 24, 2026 जालना तालुक्यातील मौजपुरी येथील श्री शिवयोगी गणेश मित्र मंडळ आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मौजपुरी येथे स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. मंडळाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करुन मानवता दाखवून दिली. गुरुवार दि. 24 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला गणेश मंडळाचे पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात 25 गणेशभक्तांनी स्वेच्छेने रक्तदान केले.