तळा: तळा तालुक्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध
Tala, Raigad | Apr 20, 2026 तळा तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध असून, विकासासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तळा तालुक्यातील दुर्गम बोरीचामाळ येथे श्री देवी लक्ष्मीनारायण मंदिराचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले. या सोहळ्यास मंत्री भरतशेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी ते बोलत होते.