जालना: चंदनझिरा सुंदर नगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट
लहान मुलाला कुत्र्याने चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Jalna, Jalna | Sep 12, 2026 जालना शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील चंदनझिरा, सुंदर नगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात एका लहान मुलाला मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांनी जालना महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे