नाशिक: बालविवाहास प्रतिबंध करणे एक सामाजिक उत्तरदायित्व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.
Nashik, Nashik | Oct 16, 2025 नाशिक, दि. 16 ऑक्टोबर, समाजातील बालविवाहांचे उच्चाटन करण्यासाठी, भारत सरकारने बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ लागू केला आहे. कायदा असतांनाही विविध कारणांमुळे सामाजिक-आर्थिक परिस्थितीत आणि जागरूकतेचा अभावामुळे समाजात बालविवाह झाल्याचे निदर्शनास येते. बालविवाह ही एक कुप्रथा असून यास प्रतिबंध करणे ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाने एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून स्विकारावी पाहिजे अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जून गुंडे यांनी व्यक्त केली.