नागपूर शहर: मेट्रो स्टेशनवरून दुचाकी चोरणारा जेरबंद, ५० हजारांची दुचाकी जप्त: नितीन चुलपार पोलीस निरीक्षक
वाहन चोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक नितीन चुलपार यांनी 6 जुलैला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकमान्य नगर मेट्रो स्टेशनच्या पार्किंगमधून दुचाकी चोरणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली आहे. आनंद सुखदेव रहांगडाले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक नितीन चुलपार यांनी दिली आहे.