नागपूर शहर: येत्या ३१ मे पासून नागपुरात रंगणार आठवे 'खासदार क्रीडा महोत्सव'; १८ खेळांचा थरार आणि भव्य बक्षीसे!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेला देशातील पहिला स्थानिक 'खासदार क्रीडा महोत्सव' आता आपल्या आठव्या टप्प्यासाठी सज्ज झाला आहे. यावर्षी हा महोत्सव ३१ मे ते ७ जून दरम्यान पार पडणार आहे.वाढती उष्णता लक्षात घेता, खेळाडूंच्या आरोग्यासाठी सर्व मैदानी स्पर्धा रात्रीच्या वेळी शहरातील २० विविध मैदानांवर खेळवल्या जातील.यंदा हा महोत्सव केवळ नागपूर शहरातील खेळाडूंसाठीच मर्यादित ठेवण्यात आला आहे.