भडगाव: भडगाव नगरपालिका प्रभागातील बोगस वाढीव नावे वगळण्यासाठी मनसेचे भडगाव मुख्य अधिकारी यांना त्यांचे कार्यालयात दिले निवेदन
भडगाव नगरपालिका सर्व प्रभागातील बोगस तसेच वाढीव मतदारांची नावे तात्काळ वगळा मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ या आशयाचे निवेदन भडगाव मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 सोमवार रोजी 10 वाजेच्या सुमारास त्याच्या कार्यालयात दिले.भडगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी आरक्षण हे काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. यानंतर भडगाव नगर परिषदेच्या संपूर्ण प्रभागातील प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या व त्यावर हरकतीन साठी आजचा शेवटचा दिवस होता.