नागपूर शहर: नंदनवनमधील डेकोरेशन गोदामाला भीषण आग; १० लाखांचे नुकसान
नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कावरे ले-आउट भागात शनिवारी एका डेकोरेशन साहित्याच्या गोदामाला अचानक भीषण आग लागली. आग इतकी भयावह होती की, पाहता पाहता आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण गोदामाला आपल्या विळख्यात घेतले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.